हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सकाळी शिवसेना नेते तथा मंत्री अनिल परब यांच्या सात ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर ईडीच्यावतीने धाड सत्र राबविण्यात आले. यावरून भाजप नेत्यांकडून अनिल परब यांच्यावर निशाणा साडह्ला जाऊ लागला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी अनिल परबांवर जोरदार टीका केली आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीचे व कुटुंबाचा तळतळाट अनिल परब यांना लागली आहे. आता शिवसेनेने म्हणू नये की मराठी माणूस असल्याने कारवाई होत आहे. शेवरी पापाची पायरी भेळी कि भोगावच लागतं, अशी घणाघाती टीका बोंडे यांनी केली आहे.
भाजप नेते अनिल बोंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल परब यांच्या कारवाईवरून त्याच्यावर निशाणा साधला. यावेळी बोंडे म्हणाले की, अनिल परब यांच्या समर्थनार्थ काही नेते रस्त्यावर येत आहेत. ही कारवाई कशी चुकीची आहे. हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
ज्या व्यक्तीने एक लाख एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना छळलं त्याची कळ अतुल लोंढे तुम्ही घेऊ नका. तुम्हाला फटका बसणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अतुल लोंढे यांच्या घरात कुठे धाड पडत आहे. जे चांगले असतील त्यांनी कमावले नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असेही बोंडे यांनी म्हंटले आहे.
सकाळपासून ईडीची छापेमारी
शिवसेना नेते अनिल परब यांच्या बांद्रा, दापोली येथील निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीची छापे टाकले. आज सकाळी सहा वाजतापासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली. परबांच्या घरी चार अधिकाऱ्यांचे पथक आहे. एक पथक पुण्यातही पोहचले. अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोलीतील 42 गुंठे जागा घेतली. त्यानंतर झालेल्या व्यवहारात कागदपत्रांवर विभास साठे नावाने बनावट स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यासाठी अनिल परब यांच्या मंत्रीपदाचा उपयोग केला असल्याचा आरोप परब यांच्यावर करण्यात आलेला आहे.