API कुलकर्णींचा ‘तो’ फोटो नजरेपुढून जातंच नाहीय..गृहमंत्री अनिल देशमुखांची भावनिक पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना विषाणूंसोबत महाराष्ट्र पोलीस रस्त्यावर उतरून लढत आहेत. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. मुंबईतल्या धारावीत पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी आणि एका 57 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काळ कुलकर्णी यांना आदरांजली वाहत मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम केला होता. आता आज देशमुख यांनी एक फोटो ट्विट करत अमोल कुलकर्णींनीचा तो फोटो नजरेपुढून जातंच नाहीय अशी एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे.

कोरोना विषाणूशी लढत असताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल कुलकर्णी यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालं. या वीर योध्याला धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अमोल कुलकर्णी यांच्या आठवणी सांगताना एरवी कर्तव्याच्या बाबतीत कातळापेक्षाही कठोर असलेले त्यांचे सर्व सहकारीही कसे भावूक झाले होते, हे मी पाहिलं. या सहकाऱ्यांना धीर देत त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी आणि राज्य सरकार खंबीरपणे उभं आहोत, याची ग्वाही दिली. मान्य आहे, की आज प्रसंग कठीण आहे. आज सगळे पोलीस कशा परिस्थितीत काम करत आहेत, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण विश्वास ठेवा, हेही दिवस लवकरच जातील असं देशमुख यांनी सदर पोस्ट मध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1261691469385129991

एक गोष्ट मात्र माझ्या डोळ्यांपुढून जात नाही. अमोल कुलकर्णी जेव्हा त्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पहिले आजारी होते तेव्हा त्यांनी फेसबुकवर शेअर केलेली एक इमेज पहायला मिळाली ती अक्षरशः माझ्या काळजाचा ठाव घेऊन गेली. “कोणी ५ कोटी दिले तर कोणी ५०० कोटी दिले, आम्ही मात्र आमचं आयुष्य देतोय.” असं वाक्य त्यावर लिहिलेलं होतं. दुर्दैवाने त्या पोस्ट मधील हा मजकूर अमोल कुलकर्णी यांच्याबाबतीत तंतोतंत खरा ठरावा, हा नियतीचा क्रूर खेळच म्हणावा लागेल. काही का असेना पण हे सत्य पचायला खूप जड जातंय. यानिमित्ताने मी सर्व पोलिसांना आश्वस्त करतो की तुमचा जीव हा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्याची किंमत ही पैशात होऊच शकत नाही. म्हणून स्वतःची काळजी घ्या. काम करताना कशाचीही गरज पडली तर ती आपल्या वरिष्ठांनापर्यंत पोचवण्यास विसरू नका… असं म्हणत देशमुख यांनी “रक्षिण्या देशार्थ, केलास जन्म सार्थ. वीर जवान शोभलास, जावो न बलिदान व्यर्थ” असे म्हणत कुलकर्णी यांचा गौरव केला आहे.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1261610230611312641

तसेच मुंबई पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या प्रोफाइल वरील हा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, “खऱ्या पोलीस कर्मचारी ‘स्वत:पेक्षा कर्तव्य महत्वाचे या ध्येयानेच जीवन जगतात. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सर्वोच्च बलिदान देणारे दिवंगत एपीआय अमोल कुलकर्णी यांच्या खासगी प्रोफाइलवरील ही पोस्ट. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच प्रार्थना.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment