मुंबई | मुंबईतील उच्चभ्रू वाधवान कुटुंब मंत्रालयातील खास पत्राच्या सहाय्याने खंडाळ्यातून सातारा जिल्ह्यातील पाचगणीला गेल्याने एकच खळबळ उडाली होती. देशात सर्वत्र लाॅकडाउन असताना आणि राज्यात जिल्ह्यांच्या सीमा सील असताना वागवान कुटुंबिय ५ गाड्या घेऊन पाचगणीत कसे गेले? त्यांना परवानगी कशी मिळाली याबाबत चौकशी करणार आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 9, 2020
वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार असल्याचे ट्विट देशमुख यांनी केले आहे. विशेष म्हणजे वागवान कुटुबाकडे गृहखात्याच्या प्रधान सचिवांचे पत्र असल्याची माहिती आहे. थेट मंत्रालयातूनच खास पत्र मिळाल्याने वागवान कुटुंब लोणावळ्यातून पाचगणीत पोहोचू शकले. आता ही परवानगी कशी मिळाली याबाबत आपण चौकशी करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 9, 2020
दरम्यान, पाचगणीत आलेल्या सदर २३ जणांना इंन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यातील कोणासही कोरोनाची बाधा झालेली नसून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.