हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर ईडी च्या रडारावर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप होता. या अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यानंतर आता देशमुखांचे दिवानजी म्हणून काम करणारे पंकज देशमुख यांच्यावरही ईडीने कारवाई केली असून त्यांनाही ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई करीत त्यांच्याकडे असलेली ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडी कडून जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यानंतर आज ईडीच्यावतीने कारवाईची सूत्रे अधिक गतिमान करण्यात आली आहे. देशमुखांच्या काटोल व वडविहराताल या दोन ठिकाणी रविवारी ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. यावेळी वडविहराताल या ठिकाणी काम करीत असलेले दिवाणजी पंकज देशमुख यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.
अनिल देशमुख यांच्यावर कारवाईत करीत ईडीच्या पथकाकडून आता त्यांची मालमत्ता ज्या ज्या ठिकाणी आहे. त्या त्या ठिकाणी छापा टाकण्यास सुरुवात करण्यात आले आहे. ईडीच्या वतीने आज देशमुखांच्या दोन निवासस्थानी छापे टाकण्यात आल्याने आता नवीन कोणती माहिती ईडीच्या हाती लागते. यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.