हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे.
अनिल देशमुख यांच्या चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आला. आता या प्रकरणात ED ने सुद्धा एन्ट्री केली आहे. ईडीडून अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉन्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडी मार्फत देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.
Enforcement Directorate (ED) has registered a case of money laundering against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh. The case has been registered on the basis of CBI's FIR: Enforcement Directorate (ED) sources pic.twitter.com/4a2Y2KSumQ
— ANI (@ANI) May 11, 2021
काय आहे प्रकरण ?
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा शंभर कोटी रुपयांची वसुली चे टार्गेट ठेवल्याचा आरोप केला होता याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते या लेटर बॉम्ब मुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा दिला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले सीबीआय कडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला त्यांची चौकशी सुरू केली . या प्रकरणानंतर मात्र राजकीय गोटात एकच खळबळ उडाली. आता मात्र एकीकडे सीबीआय आणि एकीकडं ईडी देखील अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढणार यात शंका नाही.