Saturday, February 4, 2023

ज्यांनी राम राज्यांची स्वप्ने दाखविली त्यांनीच राम भरोसे सोडले : मलिकांचा हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य व केंद्र सरकारकडून कोरोनाची हि भयानक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असताना  देशाला हादरवून टाकणारी घटना बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात घडली आहे. उत्तर परदेशातून बक्सरच्या महादेव घाट परिसरात वाहून आलेल्या मृतदेहांच्या खच पडला आहे. यावरून आता राष्ट्रवादीने भाजवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी “ज्यांनी राम राज्यांची स्वप्ने दाखविली त्यांनीच राम भरोसे सोडले”, असे रिट्विट करीत भाजप सरकारवर टीका केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरवातीला आरजेडीतील प्रमुख असलेले लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र प्रताप यादव यांनी ट्विट करीत बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रवक्ते मलिक यांनी यादव त्यांच्या ट्विटला रिट्विट करून भाजपवर निशाणा साधला.

- Advertisement -

 

उत्तर परदेशातून बक्सरच्या महादेव घाट परिसरात वाहून आलेल्या मृतदेहांच्या खचला बाजूला सारण्यासाठी येथील प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी कुजून जास्त प्रमाणात मृतदेहांची संख्या वाढत आहे. येथील स्थानिक जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे याचा परिणाम घाट परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मृतदेह उत्तर परदेशातून वाहून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.