हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगर येथील चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नुकतीच जयंती डाजरी करण्यात आली. यावेळी खासदार शरद पवार व आमदार रोहित पवार यांचाही कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी एक वादग्रस्त असे विधान केलेल्यामुळे त्यांच्या या विधानावर आक्षेप घेण्यात आला आहे. गोंटे यांनी कार्यक्रमात “राजमाता पायलीला 50 पडल्यात, महाराण्याही फुटाफुटावर सापडतील,’ असे विधान केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चौंडीत आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांच्या अगोदर माजी आमदार गोंटे यांचे भाषण झाले. त्यांनी सुरुवातीलाच अहिल्यादेवींचा उल्लेख राजमाता किंवा महाराणी असा न करता पुण्यश्लोक असा करावा, अशी सूचना मांडली. मात्र, ही सूचना करताना त्यांची जीभ घसरली.
यावेळी गोटे म्हणाले की, अहिल्यादेवींना फक्त लोकमाता किंवा पुण्यश्लोक म्हणा. त्यांना राजमाता किंवा महाराणी म्हणू नका, असे बोलून तुम्ही त्यांचा अपमान करताय. राजामाता पायलीच्या पन्नास पडल्या आहेत आणि महाराणी फुटाफुटावर आहेत, असे वक्तव्य गोटे यांनी केले. आता गोटे यांच्या या विधानावरून अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी आज दुपारी ३ वाजता जामखेडमधील खर्डा चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत.