मुंबई प्रतिनिधी | शिवसेना पक्षाचे प्रमुख असणारे ठाकरे कुटूंब निवडणुक लढण्यापासून दूर का राहते असा प्रश्न नेहमीच राजकरणात विचारला जातो. त्या प्रश्नाचे उत्तर शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या रूपाने देणार आहे. कारण आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार आहे आता निश्चितच मानले आहे. या संदर्भात वरळी येथील शिसैनिकांच्या मेळाव्यात घोषणा देखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी वरळी येथील शिवसेना विभाग प्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी आदित्य ठाकरे हे वरळी येथून निवडणूक लढणार असल्याचे शिवसेना विभाग प्रमुखांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनिल परब यांच्या घोषणेचे सचिन अहिर आणि आमदार सुनील शिंदे यांनी समर्थन केले आहे. त्याच प्रमाणे या बैठकीला खासदार धैर्यशील माने देखील उपस्थित होते.
आदित्य ठाकरे हे जर वरळीतून निवडणूक लढणार असतील तर मग सचिन अहिर यांना कुठून निवडणूक लढवली जाणार. तसेच वरळीचे आमदार सुनील शिंदे यांचे पुनर्वसन कसे केले जाणार आसा असंख्य प्रश्नांची उत्तरे शिवसेनेकडून येणाऱ्या काळात दिली जाण्याची शक्यता आहे. तर सचिन अहिर यांना शिवडी अथवा भायखळा या ठिकाणाहून लढवले जाण्याची शक्यता आहे.