हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी चे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी यासाठी गेल्या 17 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून अद्याप तोडगा निघाला नाही. दरम्यान, विलीनीकरणाचा विषय कोर्टात असून महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आता अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यावर आज सकारात्मक चर्चा झाल्याचे समजत असून परिवहन मंत्री अनिल परब आज संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना किमान पगारवाढ 5 हजार ते कमाल 21 हजार देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. तसेच ज्यांना 50 हजारांपेक्षा जास्त पगार आहे अशा कर्मचाऱ्यांना थोडं कमी वेतनवाढ देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगाराची हमी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी मुळे जो काही आर्थिक भार राज्याला सोसायला लागणार आहे, त्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या भेटीला अनिल परब निघाले आहेत.
अजित पवारांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा बैठक होऊन संध्याकाळी 6 वाजता अनिल परब हे पत्रकार परिषद घेतील. यादरम्यान एसटी संपा बाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. विलीनीकरणाचा विषय कोर्टात असल्याने अंतरिम पगारवाढ केल्यास कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सरकारकडून असा आहे प्रस्ताव –
1. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सरकारकडून प्रस्ताव
2. किमान 5000 ते कमाल 21 हजारापर्यंत वेतनवाढीचा प्रस्ताव
3. कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात जास्त वाढ करमार
4. एसटी कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला वेळेत पगार मिळण्याची खबरदारी
5. प्रत्येक महिन्याच्या 5 ते 10 तारखेला पगार होण्याची खबरदारी घेणार
6. वरिष्ठ कर्मचाऱ्यांचं वेतन 50 हजाराहून जास्त असल्याल त्यांना कमी वेतनवाढ