हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीशी संबंधित सर्वच उद्योगांना भारतात बरेच महत्व आहे. पशुपालन हे शेतीचे अभिन्न अंग आहे. त्यामुळे शेतीइतके पशुपालनही महत्वपूर्ण आहे. सध्या २०१२ च्या तुलनेत भारतात पशुधनाची ४.६ % वाढ झाली आहे. यावरून भारतात अजूनही पशुपालनाचे महत्व असल्याचे दिसून येते आहे. यातून उत्तम नफाही मिळतो. पशुपालन हा एक असा व्यवसाय आहे जिथे तोटा होण्याची संभावना अगदीच कमी असते.
सध्या पशुपालनामध्ये काही वैज्ञानिक पद्धती विकसित झाल्या आहेत. ज्याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होतो आहे. हेच पाहता सरकारने डेअरी इंटर्प्रिनर डेव्हलपमेंट योजना संचलित केली आहे. या योजनेअंतर्गत १० म्हशीच्या डेअरीसाठी ७ लाख रुपयांचे कर्ज पशुधन विभागाकडून दिले जाणार आहे. प्रत्येक वर्गाला अनुदान ही दिले जाणार आहे. सर्वाना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
पूर्वीच्या कामधेनु मिनी कामधेनु योजनेमध्ये म्हैस पालनासाठी स्वतःकडची काही रक्कम गुंतवावी लागणार होती. जमीन देखील बंधक होती आणि अनेक अटी देखील होत्या. आणि या अटी सामान्य माणसाला पूर्ण करणे शक्य नव्हते. ही योजना सुरु झाल्यापासून छोट्या डेअरी योजना संपल्या आहेत. एका वर्षांपूर्वी मोठे प्रकल्प बंद झाले. आता केंद्र सरकार ने गावातील रोजगार वाढविण्यासोबत डेअरी उत्पादन वाढविण्यासाठी डेअरी इंटर्प्रिनर डेव्हलपमेंट योजना सुरु केली आहे. या योजनेत फाईल मंजूर झाली तर अनुदान ही दिले जाणार आहे. सामान्य वर्गाला २५% आणि महिला तसेच एससी वर्गाला ३३% अनुदान दिले जाणार आहे. अनुदान संबंधित डेअरीच्या संचालकांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.