छगन भुजबळांना हायकोर्टात खेचणार; अंजली दमानियांचे आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला. दरम्यान यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र बॉम्बे हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे म्हंटल आहे .

छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाला मी बॉम्बे हायकोर्टात आव्हान देणार आहे असं ट्विट अंजली दमानिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही वेळापूर्वी केलं आहे.

मुंबई सत्र न्यायलयाच्या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले आहेत. अशा परिस्थितीतही माझ्यावर विश्वास ठेवून महाविकास आघाडी सरकार मध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिले त्याबाबत आभार मानले आहेत. दरम्यान महाविकास आघाडी सरकार आहे म्हणून माझी निर्दोष मुक्तता झालेली नाही तर वकिलांच्या मेहनतीमुळे निर्दोष सुटलो आहे असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

You might also like