हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काल पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपरासाठी डागळकरण्यात आले होते. छातीत दुखत असल्यामुळे अण्णांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, अण्णा हजारे यांची प्रकृती उत्तम असून सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने काही वेळापूर्वी डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार अण्णा राळेगणकडे रवाना झाले आहेत.
अण्णांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काल नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते. काल सर्व मुख्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. उर्वरित तपासण्या आज सकाळी करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगीतले आहे.
दरम्यान अण्णा हजारे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णांच्या प्रकृतीची चौकशी केली ओटी. अण्णांच्या सोबत स्वयंसेवक श्यामकुमार पठाडे व संदीप पठारे आहेत. दरम्यान त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.