Saturday, March 25, 2023

अण्णाभाऊ साठेंचं मोदी सरकारला वावडे? केंद्राच्या प्रबोधनकारांच्या यादीतून नाव वगळल्याने संतापाची लाट

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच नाव केंद्र शासनाच्या प्रबोधनकारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. याच्या निषेधार्त वाटेगाव येथे आज एक दिवस गाव बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. गाव बंद आवाहना मध्ये ग्रामस्थ सहभागी होऊन गावातील व्यवहार बंद ठेऊन यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

सांगली जिल्ह्यातील वाटेगाव हे अण्णाभाऊ साठेंच जन्म गाव आहे. आपल्या शाहिरीतून अण्णाभाऊनी अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे उभी केली. आणि ग्रामीण पददलित माणसाच्या जीवनाचे चित्रण आपल्या साहित्यातून समाजासमोर उभे केले. ४५ कादंबर्‍या, १५० कथा, तीन नाटके, ११ लोकनाट्ये, ७ चित्रपटकथा आणि असंख्य लावणी पोवाडे असे अण्णाभाऊ साठे यांच साहित्य प्रसिध्द झाले.

`फकिरा` या कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली. जगातील आणि भारतातील २७ भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झाले. अश्या थोर लोकशाहिर आणि साहित्यकाच नाव केंद्र शासनाच्या प्रबोधनकारांच्या यादीतून वगळण्यात आल्याने सर्वच थरातून निषेध नोंदविला जात आहे. याच निषेधार्त आज वाटेगाव येथे दिवसभर गाव बंद ठेऊन ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.