पाचव्या राज्यस्तरीय त्रिवेणी साहित्य संमेलनांची कार्यकारणी जाहीर

स्वागताध्यक्ष द. श्री. जाधव, कार्याध्यक्ष राजीव रावळ तर सचिव दिलीपराज चव्हाण यांची निवड

कराड | उंब्रज ता. कराड येथे जानेवारीत होत असलेल्या पाचव्या राज्यस्तरीय त्रिवेणी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी परवडकार द.श्री जाधव व कार्याध्यक्षपदी राजीव रावळ व सचिवपदी दिलीपराज चव्हाण यांची निवड करण्यात आली. संमेलन संयोजन समितीच्या बैठकीत सर्वानूमते हा निर्णय घेण्यात आला. यावर्षी अधिक व्यापक संमेलन घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी संमेलनाचे निमंत्रक प्रा.मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले.

उंब्रज ता.कराड येथील पाचव्या राज्यस्तरीय त्रिवेणी साहित्य संमेलनाची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी पार पडली असुन यामध्ये द.श्री जाधव स्वागताध्यक्ष, राजीव रावळ कार्याध्यक्ष, सचिवपदी पत्रकार दिलीपराज चव्हाण, सहसचिवपदी सौ सुरेखा भोसले तर उपाध्यक्षपदी राजेंद्र जाधव, सौ.वंदना शिंदे, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण कांबळे, खजिनदार तानाजी कदम यांची निवड करण्यात आली.

यावेळी त्रिवेणी साहित्य संमेलनाचे निमंत्रक प्रा.मच्छिंद्र सकटे, माजी स्वागताध्यक्ष जयंतराव जाधव, सुधाकर जाधव,संजय पाटील, माजी सचिव अभिजीत पवार, माजी उपसरपंच अजीत जाधव, काँ.सयाजीराव पाटील, प्रमोद शहा,प्रकाश मुसळे, चंद्रहास शेजवळ, विनायक जाधव, सत्वशील पाटील तसेच संमेलनाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, उंब्रजमधील साहित्य प्रेमींनी एकत्र येवून सुरू केलेल्या त्रिवेणी साहित्य संमेलनांमुळे या परिसरातील साहित्य रसिकांना व राज्यभरातील साहीत्यिकांना व्यासपीठ निर्माण झाले आहे. संमेलनाच्या वाढत्या प्रतिसादाने व लोकप्रियतेमुळे याही वर्षी तीन दिवशीय संमेलन घेण्यात येणार आहे. संमेलनासाठी महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांना बोलवण्यात येणार असून पुढील बैठकीत संमेलनाचे अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख पाहुणे, साहित्यिक व संमेलनाची तारीख जाहीर केली जाणार आहेत.