राजगुरूनगर प्रतिनिधी | खेड मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा जमीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यांच्या बाजूने प्रसिद्ध विधिज्ञ हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद केला होता. त्यांच्या विरोधात सरकारी पक्षाकडून अॅड. अरूण ढमाले यांनी बाजू मांडली तर न्या. ए. एम. अंबळकर यांनी या प्रकरणात न्यायाधीशाची भूमिका बजावली आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने पिंपरी पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दिलीप मोहिते यांनी चाकण येथे अंदोलन करणाऱ्यांना भाषण देताना कोणत्याही पध्दतीचे भडकावू विचार मांडले नाहीत. उलट त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन केले होते. त्यांनी भाषण केल्यानंतर पुणे येथे पार पडणाऱ्या जिल्हा बँकेच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यामुळे दिलीप मोहिते यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक वर्ष पोलीसांना कोणताच पुरावा मिळाला नाही मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर हा सर्व प्रकार घडवला जात आहे असा युक्तिवाद दिलीप मोहिते यांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.
मी फेकलेली टोपी विश्वजीत कदमांना लागली : चंद्रकांत पाटील
दिलीप मोहिते यांच्या अटक पूर्व जामिनाला फेटाळून लावल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेत बदल होतो का ते पाहण्यासारखे राहणार आहे. मात्र आज मोहितेंचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने राष्ट्रवादीच्या संकटात वाढ झाली आहे. कालच अजित पवार यांनी दिलीप मोहिते यांची पाठ राखण केली होती. आपण या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. या प्रकरणी कुणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नका असे मी मुख्यमंत्र्यांना म्हणले आहे असे अजित पवार म्हणाले होते. मात्र आज मोहितेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे.