सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,
जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. अनेकवेळा खासदार व भाजप सरकारकडे दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आत भाजपला हटविल्याशिवाय दुष्काळाचा कलंक पुसला जाणार असल्याचे मत श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. तर देशात हुकुमशाही आणणे व संविधान बदलणाऱ्यांविरोधात आम्ही असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.
गेली अनेक दिवस आम्ही पाण्यासाठी आंदोलन करतो. मात्र विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षात पाण्यासाठी कोणतेही ठोस काम केले नाही. पाण्यासाठी लाईटचे बिल घेण्याची गरज नाही, ही मात्र 81-19 योजनेच्या माध्यमातुन ते वसुल करतात असा गंभीर आरोप पाटणकरांनी केला आहे.
एकुणच दुष्काळी भागातील पाणी प्रश्नासाठी सरकारला नमवावे लागेल. या प्रत्येक लढाईत सोबत राहण्याचे आश्वासन राजू शेट्टी व विशाल पाटील या दोन्ही उमेदवारांनी दिले आहे, म्हणूनच सांगली व हातकणंगले मतदार संघात या दोघांना पाठिंबा दिला आहे. मोर्चा काढल्याशिवाय सिंचन योजनेचे पाणी एकदाही मिळाले नाही. आवर्तन सुरू करायच्या वेळीच नेमकी वीज तोडलेली असते. तर उमेदवार पाणी प्रश्नावर बोलतच नाहीत जात मध्ये आणतात असा टोला त्यांनी पडळकरांचे नाव न घेता पाटणकरांनी लगावला आहे.