धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

apoorva hendre
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापुरमध्ये एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचा मृतदेह फुटपाथवर आढळून आला आहे. या तरुणीने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. पोलीस या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अपूर्वा हेंद्रे (apoorva hendre) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे. अपूर्वा (apoorva hendre) ही कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ प्रवीण हेंद्रे यांची मुलगी आहे.

अपूर्वाचा व्हिसेरा राखून ठेवला
अपूर्वाचा (apoorva hendre) मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आल्याने पोलिसांकडून आता अधिक तपास केला जातो आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपूर्वाचा व्हिसेरा राखून ठेवला असून त्याच्या रिपोर्टमधून अधिक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शाहूपुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अपूर्वा गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ
अपूर्वा (apoorva hendre) ही गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. आत्महत्येआधी नेमकं काय घडलं, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेच्या दिवशी रात्री उशिरा अपूर्वा घरी आली होती. त्यानंतर मध्यरात्री एक वाजता ती पुन्हा घराबाहेर पडली होती. बराच वेळ ती घरी न आल्याने तिच्या वडिलांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती. अनेक ठिकाणी तिचा शोध घेण्यात आला मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर अपूर्वाच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी अपूर्वाचा शोध घेतला असता न्यू शाहूपुरी भागातीली रिक्षा स्टॉपजवळ तिचा मृतदेह आढळून आला. शाहूपुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
लग्नास प्रतिसाद देत नसल्याने 17 वर्षीय मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्यातील दौंडमधील घटना

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये 4 वर्ष प्रीमियम भरून मिळवा लाखो रुपये !!!

Car Loan : सेकंड हँड कारसाठी कर्ज कसे मिळवावे ते जाणून घ्या

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा पैसे दुप्पट !!!

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे देण्यात आले संघाचे कर्णधारपद