Tuesday, June 6, 2023

मोदींमुळे भविष्यात अनेक देशात भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होईल; भगतसिंह कोश्यारींचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ‘पंतप्रधान मोदींमुळे भविष्यात अनेक देशात भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होईल असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) हे मागच्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी असेच विधान करून नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले आहे.

काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी?
उत्तर अंबाझरी मार्गावरील सेवासदन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित सोहोळ्यात अकोला येथील एनकरेज एज्युकेशन या संस्थेला रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी हे विधान केले आहे. भारतीय वंशाची व्यक्ती इंग्लंडची पंतप्रधान झाली. आता भविष्यात इतर देशातही भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होईल. कारण देशाचे नेतृत्त्व नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. ते झाडांची पानेच नाही तर मुळांना देखील पाणी घालत आहेत. त्यामुळेच वटवृक्ष मोठा होत आहे, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य अनिरुद्ध देशपांडे, विशेष अतिथी म्हणून भारतीय संगणक विज्ञानचे लेखक यशवंत कानेटकर, शिक्षक आमदार नागो गाणार तसेच सेवासदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत उपस्थित होते.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती