iphone वरून अँड्रॉइड फोनवर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरा ‘हे’ Apps

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याचदा आपण नवीन iphone फोन घेतो तेव्हा आपल्या जुन्या मोबाइलवरून नवीन मोबाइलमध्ये डेटा ट्रान्सफर करताना त्रास सहन करावा लागतो. तसेच केबलद्वारे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी बराच वेळ देखील वाया जातो.

मात्र आता काही एप्लिकेशन्सच्या मदतीने आपल्या iphone मधील डेटा सहजपणे अँड्रॉइड फोनवर ट्रान्सफर करता येईल. यामध्ये Google Drive पासून Drop Box सारख्या अनेक एप्सचा समावेश आहे, तर चला मग असे आणखी कोणते ऍप्स आहे ज्याद्वारे आपल्याला अगदी सहजपणे डेटा ट्रान्सफर करता येईल ते जाणून घेऊयात…

What Happens When Your Gmail and Google Drive Runs Out of Storage - Dignited

1. Google Drive

Google Drive हा iphone वरून अँड्रॉइड ऍप वर डेटा ट्रान्सफर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. याद्वारे आपल्याला iOS मधील डेटा Android डिव्हाइसवर सहजपणे ट्रान्सफर करता येतो. Google Drive कडून युझर्सना आपल्या मीडिया फाईल्स स्टोअर करण्यासाठी 15 GB पर्यंत फ्री स्टोरेज स्पेस दिला जातो. येथे आपल्या iPhone चा डेटा स्टोअर करून नंतर हा डेटा डाउनलोड करून Android डिव्हाइसवर घेता येऊ शकतो. तसेच यामध्ये जो काही डेटा स्टोअर केला जाईल तो कोणत्याही मालवेअर किंवा व्हायरसपासून सुरक्षित असेल.

Dropbox Desktop Experience for macOS & Windows

2. Dropbox

ड्रॉपबॉक्स ही क्लाउड स्टोरेज सर्व्हिस आहे. आपल्या सर्व फाईल्स ड्रॉपबॉक्समध्ये सेव्ह करून कोणत्याही फोनवर कुठूनही डाउनलोड करून घेता येईल. आपल्या iPhone चा डेटा देखील या क्लाउडवर स्टोअर करता येऊ शकेल आणि नंतर जेव्हा गरज भासेल तेव्हा तो Android फोनवर डाउनलोड करता येईल.

Samsung Smart Switch: Transfer Contacts, Music and More I Samsung US

3. samsung smart switch

सॅमसंग स्मार्ट स्विच ऍप एक वायरलेस डेटा ट्रान्सफर ऍप आहे. याद्वारे आपल्या आयफोन वरून Android वर डेटा सहजपणे ट्रान्सफर करता येईल. तसेच यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. यासाठी, फक्त दोन्ही डिव्हाइसेसना USB केबलने जोडावे लागेल. यसोबतच आपले कॉन्टॅक्टस, मेसेजेस, इमेज, डॉक्युमेंट्स, कॉल लॉग, म्युझिक कॅलेंडर आणि बरेच काही ट्रान्सफर करता येतील.

Official] Download | MobileTrans

4. MobileTrans

मोबाइल ट्रान्स द्वारे फक्त एका क्लिकवर आपल्याला सहजपणे दोन डिव्हाइसेसमध्ये डेटा स्विच करता येऊ शकेल. यासाठी आपल्या कॉम्प्युटरवर Trans MobileTrans हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागेल. यानंतर आपल्याला दोन्ही डिव्हाइसेसना कॉम्प्युटरशी जोडावे लागेल आणि ‘फोन ट्रान्सफर’ पर्यायामध्ये ‘फोन टू फोन’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर, जी फाईल ट्रान्सफर करायची आहे ती निवडा आणि स्टार्ट बटण दाबा. यानंतर काही वेळात आपला डेटा दुसऱ्या Android डिव्हाइसवर कॉपी केला जाईल.

Severe Flaws in SHAREit Android App Let Hackers Steal Your Files

5. SHAREit

डेटा ट्रान्सफर करण्यासाठी हे सर्वोत्तम एप्सपैकी एक आहे येते. याद्वारे विना इंटरनेट आपला डेटा सहजपणे ट्रान्सफर करता येतो. याद्वारे डेटा ट्रान्सफरसाठी 20 Mbps पर्यंतचा स्पीड मिळतो. iphone

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.docs&hl=en_IN&gl=US

हे पण वाचा :

Telegram चे ‘हे’ 5 फीचर्स आहेत खूप उपयोगी, त्याविषयी जाणून घ्या

FD Rates : प्रेशर कुकर बनवणारी ‘या’ कंपनीच्या FD वर मिळते बँकांपेक्षा जास्त व्याज

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये केली 290 पट वाढ

Post Office च्या योजनेमध्ये फक्त 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचा विमा

Investment : ‘या’ सरकारी बचत योजना देत आहेत FD पेक्षा जास्त व्याज, त्याविषयी जाणून घ्या