हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहसा आपण एकदा जेवलो कि नंतर आपल्याला काही खाऊ वाटत नाही. पण जगात असेही काही लोक असतात की ज्यांना पोटभरून कितीही खाल्लं तरी काही वेळाने त्यांना भूक लागतेच. जास्त अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवतात. तसेच अपचन, पोटात जळजळ यांसारख्या समस्यांना तोंड दयावे लागते. त्यामुळे आपल्याला सतत भूक का लागते? यामागील नेमकी कारणे काय आहेत? हे सविस्तरपणे जाणून घेऊया…
1) नाश्ता न केल्यामुळे-
रोज सकाळी नाश्ता करणे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे नाश्ताच्या ,माध्यमातून दिवसाची 50% ऊर्जा मिळते. त्यामुळे जर वेळेच्या अभावी किंवा अन्य कोणत्या कारणांमुळे तुम्ही सकाळी नाश्ता करत नसाल तर तुम्हाला सातत्याने भूक लागू शकते.
2) झोप न लागणे-
प्रत्येक व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे. तुम्हाला कदाचित हे माहित नसेल परंतु पुरेशी झोप मिळाली नाही तर तुम्हाला गरजेपेक्षा जास्त भूक लागते. कारण झोपेच्या कमतरतेमुळे तुमची भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर याचा परिणाम होतो. त्यामुळे ज्यांना लवकर झोप लागत नाही किंवा कमी प्रमाणात झोप मिळते अशा लोकांना खूप भूक लागते आणि जेवल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटत नाही.
3) प्रोटीनची कमतरता-
शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तुम्हाला नेहमी भूक लागते आणि काही ना काही खात राहावं असं वाटत. प्रोटीनमुळे तुमची भूक कंट्रोल मध्ये राहण्यास मदत करतात. रोजच्या जेवणात प्रथिनांचा समावेश केल्याने शरीरात काही संप्रेरकांचे उत्पादन वाढते जे तुम्हाला पोट भरण्याचे संकेत देतात आणि तुमची भूक नियंत्रित करतात.
4) आतड्यांतील जंतामुळेही सतत भूक लागते
कधी कधी आतड्यात जंत झाल्यामुळे सुद्धा सतत भूक लागते. कारण पोटातील हे जंत तुमच्या शरीरातील सर्व आवश्यक पोषण खाऊन टाकतात आणि तुमच्या शरीरात फक्त चरबी राहते. यामुळे सुद्धा तुम्हाला खूप भूक लागायला लागते.
5) मधुमेह-
तुम्हाला जर सतत भूक लागत असेल तर त्यामागे मधुमेह हे सुद्धा एक कारण असू शकत. मधुमेह असलेल्या लोकांना इतर लोकांपेक्षा जास्त भूक लागते. याचे मुख्य कारण म्हणजे रक्तातील ग्लुकोज इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे तुमचे शरीर अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला सतत भूक लागते.