औरंगाबाद प्रतिनिधी | शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून बराच काळ राहिलेले शिवसेनेचे खंदे समर्थक अंबादास दानवे यांचे नाव अचानक औरंगाबाद विधान परिषदेच्या जागेसाठी नाव पुढे आले आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. अर्जुन खोतकर हे जालन्याचे तर अंबादास दानवे औरंगाबादचे असल्याने पक्षश्रेष्ठीना प्राधान्य देताना अंबादास दानवे यांनाच द्यावे लागणार आहे.
औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपचा शिवसेनेला पाठिंबा राहणार आहे. संख्याबळ शिवसेनेकडे जास्त असल्याने शिवसेनेचा उमेदवार सहजच निवडणूक जिंकेल असे चित्र आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांचा या जागेवर डोळा आहे. आता अंबादास दानवे यांचे नाव चर्चेत आल्याने खोतकरांची गोची झाली आहे.
अंबादास दानवे यांच्यासह अन्य दोन शिवसेनेच्या नेत्यांचे नाव देखील या विधानपरिषदेच्या जागेसाठी चर्चेत आहे. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, राजू वैद्य हे देखील या पदासाठी इच्छुक आहेत. मात्र अंबादास दानवे हे प्रबळ दावेदार आहेत. तसेच दानवेंच्या आणि खोतकर यांच्यात देखील दानवेच वजनदार आहेत.