अर्णब गोस्वामीला हायकोर्टाचा झटका! चौकशीला हजर राहण्याचे दिले आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात चौकशीला बोलावल्यानं त्याविरोधात गोस्वामी यांनी तातडीनं याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टानं अर्णब गोसस्वामीने चौकशीला न जाण्यासंदर्भांतील दिलेली कारण फेटाळून लावत मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले.

सविस्तर माहितीनुसार, अर्णब गोस्वामी यांना मुंबईतील पायधुनी पोलिसांनी चौकशीसाठी उद्या, बुधवारी बोलावले होते. त्याविरोधात गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात तातडीची याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेण्यात आली. एकाच घटनेत अनेक एफआयआर दाखल करता येणार नाहीत, असं सुप्रीम कोर्टानं आदेशात स्पष्ट सांगितलं आहे. शिवाय पायधुनी पोलीस ठाणे हे कन्टेनमेंट झोनमध्ये असल्यानं चौकशीसाठी पोलीस ठाण्यात न जाण्याची मुभा द्यावी, अशी विनंती गोस्वामी यांनी ज्येष्ठ वकील हरिश साळवेंमार्फत केलेल्या याचिकेद्वारे केली.

मात्र, जर गोस्वामी दररोज आपल्या स्टुडिओत जात असतील तर त्यांना पोलीस ठाण्यात जायला काय हरकत आहे? चौकशी करू नये अशी विशेष व्यक्ती आहे का गोस्वामी? पायधुनी कन्टेनमेंट झोन असेल तर त्यांनी पायधुनीऐवजी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात जावं, असं म्हणणं राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील कपिल सिब्बल यांनी मांडलं. त्यानंतर न्या. उज्ज्वल भुयान आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठानं गोस्वामी यांनी विनंती फेटाळून लावली. त्यांना एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहावे, असे आदेश दिले. तसंच खंडपीठानं गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण देत त्यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी १२ जून रोजी ठेवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment