हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या हाहाकाराने त्रस्त आहे, तर दुसरीकडे असे बरेच लोक आहेत जे या धोकादायक साथीला अजूनही गंभीरपणे घेत नाहीत. युगांडामध्येही अशीच एक घटना घडली ज्यामध्ये आफ्रिकेत कोरोना विषाणू नसल्याचे सांगणाऱ्या एका पाद्रीस तुरूंगात डांबले गेले. युगांडाच्या प्रशासनाने आफ्रिकेतील कोरोना विषाणूचे अस्तित्व नाकारल्याचा आरोप करत एका वादग्रस्त पादरीला आहे तुरूंगात पाठविले आहे.
मुख्य पादरी ऑगस्टीन यागावर आरोप केला कि शुक्रवारी रिव्हीवल ख्रिश्चन चर्चमध्ये त्याने कथितपणे यूगांडा आणि आफ्रिका मध्ये कोरोना विषाणू नसल्याचे सांगितले आणि त्याचे हे निवेदन स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीने दाखवले. युगांडाचे पोलिस प्रवक्ते पॅट्रिक ओणॅंगो म्हणाले की,रिव्हाव्हल चर्चचे पास्टर यिगा याच्यावर आरोप ठेवण्यात आले आणि अशा कारणास्तव तुरुंगात पाठविण्यात आले आहे जे की त्याचे असे वागणे म्हणजे”कोविड -१९” च्या प्रसाराचे कारण बनू शकते. त्याला ७ वर्षांपर्यंत जेलमध्ये ठेवण्यात येईल “
युगांडामध्ये, या वेळी कोरोना विषाणूची लागण झालेल्या ३३ लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्याचबरोबर, संपूर्ण जगाबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत या साथीच्या आजारामुळे ७.५ लाखाहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत, त्यापैकी ३७,००० हून अधिक लोक मरण पावले आहेत. कोरोना विषाणूचा सर्वाधिक बळी पडलेला देश म्हणजे अमेरिकेचा, जेथे १.६० लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर, या विषाणूमुळे ११ हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडलेल्या मृत्यूच्या बाबतीत इटली पहिल्या क्रमांकावर आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!
धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न
जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन
तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका