राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Raj Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सांगलीमधील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी 28 एप्रिल 2002 रोजी राज ठाकरे यांच्यासह 10 जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. आता राज ठाकरे यांना वॉरंट जारी करत 11 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिराळा कोर्टाने 2008 मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी एप्रिल महिन्यात वॉरंट काढले होते. पण राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाली असल्याने बुधवारी झालेल्या सुनावणीला गैरहजर राहिले. मात्र, मनसेचे नेते शिरीष पारकर या सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. पण राज ठाकरे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले.

नेमकं प्रकरण काय?

2008 मध्ये रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडले होते. विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह 10 मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.