हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने येथे रणधुमाळी सुरु झाली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. अशात आज आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक दावा केला आहे. “आप पक्षाने गुजरात निवडणुकीतून माघार घेतली तर भाजप केंद्रीय यंत्रणांच्या तपासात अडकलेले मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना सोडेल, अशी भाजपने त्यांना ऑफर दिल्याचे केजरीवाल यांनी म्हंटले आहे.
अरविंद केरीवाल यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप नेते अगोदर मनीष सिसोदिया यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, आता ते मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम आदमी पक्षाला सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री बनण्याचा भाजपचा प्रस्ताव मनीष सिसोदिया यांनी नाकारला होता.
आम्हाला दोन्ही जागा जिंकण्याचा आत्मविश्वास असता तर त्यांनी असा आग्रह धरला नसता. भाजपला गुजरात आणि दिल्ली एमसीडी निवडणुकीत पराभव होण्याची भीती आहे, म्हणून त्यांनी दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्याची खात्री केली असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.