व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

केजरीवाल दहशतवादी असल्याचा आमच्याकडं भक्कम पुरावा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात आता दहशतवादाचा मुद्दा नव्यानं अवताराला आहे. केंद्रीय मंत्री व भाजपाचे दिल्ली विधानसभा निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दहशतवादी असल्याचा दावा केला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी याबाबाबतचे विधान केलं आहे.

जावडेकर म्हणले कि, ”केजरीवाल तुम्ही एकदम निरागस चेहरा करून विचारत आहात की मी दहशतवादी आहे का? तुम्ही दहशतवादी आहात याचे भरपूर पुरावे आहेत. तुम्ही स्वतः म्हणाला होता की, मी अराजकवादी आहे. अराजकवादी व दहशतवादात फारसा फरक नसतो, असं जावडेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, जावडेकरांनी केजरीवाल यांना दहशतवादी म्हटल्यानंतर आता आम आदमी पार्टीने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी जावडेकरच्या टीकेचा खरपूस समाचार घेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. ते म्हणाले कि, ” देशाच्या राजधानीत हे घडत आहे जेथे केंद्र सरकार बसते तेथे निवडणूक आयोग अस्तित्वात आहे. एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अशी भाषा वापरण्याची परवानगी कशी काय दिली जाऊ शकते? अरविंद केजरीवाल दहशतवादी असतील तर मी भाजपाला जाहीर आव्हान करतो कि त्यांना त्यांना अटक करा.”