हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह इतर आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी देण्यात आली आहे. मुंबईतील किला कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आलं होतं.
आर्यन खान न्यायालयात हजर असताना, दंडाधिकारी, एनसीबी आणि आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांच्यात बराच काळ वाद झाला. एनसीबीने आर्यन खानवर आरोप केला की, त्याच्या फोनवरून आक्षेपार्ह गोष्टी आणि ड्रग्ज चॅट्स जप्त करण्यात आल्या आहेत, तर स्टार किडचे वकील सतीश मानशिंदे यांनी प्रत्युत्तरात एकामागून एक युक्तिवाद सादर केले.
एनसीबीच्या या मुद्द्याला उत्तर देताना सतीश मानशिंदे म्हणाले – ” आर्यन खानला शिपमध्ये ड्रग्ज विकण्याची गरज नाही. तो शिपमध्ये का गेला याबद्दल एनसीबीचे कोणतेही काम नाही. आर्यन त्याला हवे असल्यास संपूर्ण जहाज खरेदी करू शकतो.”
आर्यनच्या मोबाईलशिवाय त्याची एकही वस्तू जप्त करण्यात आलेली नाही. त्याच्या मित्रांना यासाठी अटक करण्यात आलं कारण त्यांच्याकडे 6 ग्रॅम चरस मिळालं होतं. आर्यन चा त्याच्याशी अजिबात संबंध नाही असाही दावा त्याच्या वकिलांनी केला.