उद्धव ठाकरे आजारी असल्याने फडणवीसांना मुख्यमंत्री करावे; आठवलेंची अजब मागणी

Thackeray Fadanvis Athawale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असून अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर विरोधकांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे हे आजारी असल्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाचा कारभार द्यावा असा अजब सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? यासंदर्भाने आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना रामदास आठवलेंनी चक्क विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेच नाव घेतलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठीकठाक होण्यासाठी २- ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे अशी अजब मागणी आठवलेंनी केली.

दरम्यान, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली आहे. त्यावरुन, भाजप नेते वारंवार महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा पदभार इतर नेत्यांकडे देण्याची मागणीही भाजपा नेत्यांकडून होत आहे.