ठाणे प्रतिनिधी । भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. एका जाती धर्माचा हा देश नाही. भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हता आणि कधीही बनणार नाही. भारलाता हिंदू राष्ट्र बनू देणार नाही असे आव्हान एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदूद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना यांना दिले.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून एमएमआयचे उमेदवार अयाज मौलवी निवडणूकीच्या रिंगणात उभे आहे. त्यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी गोविंदवाडी मैदानात झालेल्या जाहीर सभेत ओवेसी बोलत होते.
दरम्यान, जगभरात सर्वाधिक सुखी मुस्लीम हे भारतात आढळतील, सोबतच भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते. आरएसएस चे सरसंचालक यांनी केलेल्या याच वक्तव्याचा खरपूस समाचार ओवेसी यांनी भाषणातून घेतला.