हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात हिजाब मुद्द्यावरून वातावरण तापलं असून पाकिस्तानने याच पार्श्वभूमीवर भारतावर टीका केली होती. मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे मूलभूत मानवी हक्कांचे घोर उल्लंघन आहे. असे म्हणत पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांनी भारतावर टीका केल्यानंतर आता एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तान ला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानने आम्हाला शिक्षणाबद्दल शिकवू नये असं त्यांनी म्हंटल
मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत पाकिस्तानने आम्हाला ज्ञान देऊ नये. पाकिस्तानच्या घटनेनुसार कोणताही बिगर मुस्लिम पाकिस्तानचा पंतप्रधान होऊ शकत नाही. मला पाकिस्तानच्या लोकांना सांगायचे आहे की इकडे पाहू नका, तिकडेच पहा. तुमची पाक-बलुचिस्तानशी कोणती भांडणे आहेत हेच कळत नाही. हा देश माझा आहे, आमच्या घरचा मामला आहे. त्यात आपले नाक किंवा पाय ठेवू नका. अन्यथा तुम्हाला दुखापत होईल
ते पुढे म्हणाले, हिजाब आणि बुरख्यावर आमचा अधिकार नाही. आमचा मुलभूत अधिकार संविधानावर आहे. मी काय घालतो आणि काय खातो, यासाठी कोणाच्या बापाकडे पाहण्याची गरज नाही. माझी मुलगी, आई, बायको आणि खाला काय घालतील याची काळजी करू नका. तुम्ही तुमचे घर बघा.