पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – आषाढी एकादशीनिमित्तानं लाखो वारकरी (Warkari) आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. राज्यभरातील वेगवेगळ्या दिंडीमधून पायी प्रवास करत हे वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. ऊन, पाऊस, लहरी हवामान यापैकी कशाचीही पर्वा न करता विठूरायाच्या भेटीसाठी हे वारकरी (Warkari) पंढरपुरात मोठ्या भक्तीभावानं दाखल झाले आहेत.
आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर या मार्गावर दमलेल्या वारकऱ्यांच्या (Warkari) सेवेसाठी अनेक जण झटत असतात. पंढरपूर तालुक्यातील शिरसगाव मंडप येथिल सुभाष वाघ यांचे फिरते हॉटेल पंढरपूरमध्ये लागले आहे. वारीमधील प्रत्येक प्रत्येक विसावा, मुक्कामाच्या ठिकाणी ते चहाचं छोटं हॉटेल लावतात. त्यांच्या हॉटेलमध्ये केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चहा तयार करून वारकऱ्यांना (Warkari) वाटला. तसेच त्यांनी आषाढी वारीसाठी पायी आलेल्या दिंडीमधील वारकऱ्यांची (Warkari) भेट घेऊन आपुलकीने विचारपूससुद्धा केली.
रावसाहेब दानवे यांनी पंढरपुरात दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा pic.twitter.com/YbWaMJ3cuw
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 10, 2022
मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं
आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी (Warkari)मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?