‘अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?’ आशिष शेलारांचा संजय राऊतांवर घणाघात

0
38
Raut and Shelar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली.अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर शिवसेना विरुद्ध भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवल्यानंतर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला आहे.

त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलीसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका “सिंह” यांना “परमवीर” का देताय? खरी नौटंकी तर हीच आहे. एका “युवराजला” वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?” अशा शब्दात आशिष शेलार यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये फक्त राऊतांवरच नाही, तर युवासेनेचे प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही टीका केली आहे.

रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन “दिशा सालीयन” बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी…” असा इशाराही आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here