हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यप्रदेशातील कमलनाथ यांच्या नैतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये सध्या मोठी उलथापालथ सुरु आहे. काँग्रेसचे ८ आमदार दिल्लीत पोहोचले असून हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यप्रदेशातील ही राजकीय खेळी भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ चा भाग असल्याचे बोलले जात असताना काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या ऑपरेशन लोटसवर सडकून टीका केली.
सत्तेसाठी भाजपने सुरू केलेल्या या प्रकाराला ऑपरेशन लोटस नव्हे तर करोना व्हायरसच म्हटलं पाहिजे. भाजपचं वर्तन हे करोना व्हायरसपेक्षाही घातक असून त्याची दक्षता घेतलीच पाहिजे, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजपवर हल्ला चढवला. भाजपचं ऑपरेशन लोट्स हा नित्याचाच भाग असून त्याची आम्हाला सवय झाली आहे. लोकशाहीला मानणारे राजकीय पक्ष ऑपरेशन लोटसला कधीही भीक घालणार नाहीत असा दावाही चव्हाण यांनी यावेळी केला.
कमलनाथ सक्षम मुख्यमंत्री आहेत. मध्यप्रदेशात काँग्रेसच्या सरकारला कोणताही धोका नाही.
ऑपरेशन लोटसला खतपाणी घातलं जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
खरं तर भाजपचं हे #OperationLotus नसून, #coronavirus आहे. त्यावर अँटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.#KamalNath pic.twitter.com/kwa6IAcLm6— Ashok Chavan (@AshokChavanINC) March 4, 2020
देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गानेच येथील सरकारे चालली पाहिजेत. मग कोणतीही सरकारे असोत. ज्या राज्यात त्यांचं सरकार नाही. तिथले आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न असतो. भापजपंच हे वर्तन करोना व्हायरसपेक्षाही कठीण आहे. त्याची दक्षता घेतलीच पाहिजे, असं सांगतानाच त्यावर अँटिबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला. मध्यप्रदेशातील कमलनाथ हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारला कोणताही धोका नाही, असंही चव्हाण यांनी प्रसारमाध्यांना निक्षून सांगितलं.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.