नांदेड प्रतिनिधी। राजकारणात कोणाचे दिवस कसे फिरतील काही सांगत येत नाही. भाजपने विनोद तावडे यांचे तिकीट कापले जाणे हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. त्यातच तावडेंनी नांदेड दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण यांना निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला होता. विधानसभा निवडणुकीत जनता आम्हालाच बहुमत देणार आहे तेव्हा अशोक चव्हाण यांनी झाकली मूठ सवा लाखाची, यानुसार निवडणूक लढाऊ नये. असे तावडे त्यावेळी म्हणाले होते.
मात्र, आता तावडे यांचेच तिकीट भाजपने कापून त्यांना निवडणूक लढवण्यापासून दूर केले आहे. तेव्हा तावडेंना ‘त्या’ सल्ल्याची आठवण करून देत अशोक चव्हाण यांना वचपा काढण्याची आयती संधी चालून आली. या संधीचा फायदा घेत अशोक चव्हाण यांनी ट्विटर वर मिश्किल ट्विट करत तावडेंविषयी सहानुभूती दर्शवली.
चव्हाण आपल्या ट्विट मध्ये म्हणाले कि,”मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे. एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे.” चव्हाण यांचे हे ट्विट आता सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. परंतु, सध्यातरी चव्हाण यांनी आपल्या ट्विटद्वारे जशास तसे अशी फिटम फाट केली आहे.
मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे.
एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे.— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 4, 2019