हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ashok Saraf) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कला क्षेत्रातील मोठ्या योगदानासाठी अभिनेते अशोक सराफ याना नुकताच संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत नुकतीच अकादमीने घोषणा केली असून सोशल मीडियावर अशोक सराफ यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. अशोक सराफ यांना अलीकडेच २०२३ मधील मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक मामांना ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर आता त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे.
ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी आजपर्यंत मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात प्रचंड काम केले आहे. केवळ सिनेजगतात नव्हे तर मालिका विश्वात आणि मराठी रंगभूमीवर देखील बहुमूल्य योगदान दिले आहे. (Ashok Saraf) म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीला सलाम करण्यासाठी आता त्यांना देशातील सर्वात मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशोक सराफ याना ‘महाराष्ट्र भूषण’ नंतर संगीत व नाटक अकादमीकडून त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि भरीव योगदानासाठी महत्वाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्यावर अर्थात अशोक मामांवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
अशोक मामांची कारकीर्द (Ashok Saraf)
अशोक सराफ यांना आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं. पण सुरुवातीला अभिनय क्षेत्रात येऊ आणि खूप काही करू असं काही पक्क ठरलेलं नव्हतं. कला विश्वात येण्यापूर्वी अशोक सराफ हे बँकेत काम करत होते. मात्र आतल्या आत त्यांच्यातील कलाकार ते जोपासत होते. केवळ वडिलांचा शब्द म्हणून ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. दरम्यान, बँकेतील कामासोबत त्यांनी अभिनयाचा छंद म्हणून नाटकांत काम केले. (Ashok Saraf) छंद जोपासताना त्यांनी अनेक नाटक, मालिका आणि सिनेमे सुद्धा केले. हळूहळू प्रेक्षक त्यांना अभिनेता म्हणून स्वीकारत होते आणि पसंतदेखील करत होते.
अशोक सराफ यांनी १९६९ पासून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी आपल्या कारकिर्दीत २५० हून अधिक मराठी चित्रपट केले. यातील १०० व्यावसायिक हिट ठरले. अशाप्रकारे पुढे अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या आपल्या अभिनयाची जादू कायम राहिली आणि ही जादू अशी काही चालली की, रसिकांना अक्षरश: वेड लागलं. अनोखा ढंग, कमालीचे संवाद फेक कौशल्य आणि परफेक्ट कॉमिक टायमिंगमुळे अशोक सराफ कधी नटसम्राट झाले कळलंच नाही.
आज सिनेविश्वातील अनेक कलाकार त्यांना पाहून प्रेरणा घेताना दिसतात. काही कलाकार अशोक मामांना चालत फिरत अभिनयाचं विद्यापीठ देखील म्हणतात. आजवर अशोक मामांना अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. इतके लोकप्रिय होऊनही अशोक सराफ यांनी कधीही प्रसिद्धीचा गैरवापर केला नाही. कायम जमिनीवर पाय ठेवले आणि आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहिले.
विनोदी भूमिकांमध्ये तर त्यांचा हातखंडाच होता. त्यामुळे त्यांनी अनेक कलाकृतींमध्ये विनोदी पात्र साकारली आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. केवळ विनोदीच नवे तर गंभीर पात्र देखील त्यांनी साकारली. आज कलाविश्वात त्यांना प्रेमाने अशोक मामा तर अभिमानणारे ‘अशोक सम्राट’ असे संबोधतात. (Ashok Saraf)