हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर असताना एका हॉटेल वाल्याने त्यांचा ताफा अडवून त्यांना 2014 सालची उधारी मागितली. भर कार्यकर्त्यांपुढे हॉटेल चालकाने सदाभाऊंशी हुज्जत घातल्याने सदाभाऊ यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केले. यानंतर खुद्द हॉटेल मालकाने सदाभाऊंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पैसे बुडवायचे म्हणून सदाभाऊ खोत राष्ट्रवादीचे नाव आहेत , पण मी राष्ट्रवादीचा नव्हे तर रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. जोपर्यंत मला माझ्या हॉटेलाची उधारी मिळेपर्यंत सदाभाऊ यांना अडवणार आणि पैसे वसूल करणार अशी भूमिका हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना दिली आहे.
माझ्यावर जे काही गुन्हे आहेत ते शेतकरी चळवळीतील आहेत असेही हॉटेल मालकाने सांगितले. मला स्वत: सागर खोत हे भेटायला आले होते. त्यांच्या सांगण्यावरून 8 ते 10 दिवस कार्यकर्ते जेवण खायला येत होते. मला सागर म्हणाले तुमचं कितीही होऊद्या भरून देऊ असंही अशोक शिनगारे यांनी सांगितले.