शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार
बेदरकार भरधाव डंपरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत पिता- पुत्र जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या भयावह अपघातात पिता-पुत्रांची डोकी धडावेगळी झाली होती. दुचाकीवरील तिघेही कराड तालुक्यातील हजारमाची येथील आहेत. पती, पत्नी व मुलगा दुचाकीवरून जात असताना मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातात अंकुश शिवाजी साळुंखे (वय- 40), आदित्य अंकुश साळुंखे (वय- 14) अशी मृत पिता- पुत्रांची नावे आहेत. तर सोनाली अंकुश साळुंखे (वय- ३४ रा. हजारमाची, ता. कराड) असे जखमी महिलेचे नाव आहे. आष्टा – इस्लामपूर रस्त्यावर मंगळवारी सकाळी ९ वाजता हा अपघात झाला. पोलिस निरिक्षक अजीत सिद्ध, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत यांनी घटनास्थळी भेट देवून मदतकर्य केले.
यबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मयत अंकुश हे पत्नी सोनाली, मुलगा आदित्य यांना घेवुन सीडी डीलक्स मोटरसायकल क्रमांक (एम.एच- 50 -आर- 1676) वरून आष्ट्याकडून इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते. आहिरवाडी फाटा येथील वळणावर आले असता इस्लामपूरकडून आष्ट्याकडे निघालेल्या भरधाव डंपरने विरुध्द दिशा बदलुन मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की धडकेत अंकुश व आदित्य दोघे जागीच ठार जाले. तर सोनाली या गंभीर जखमी झाल्या. डंपर चालकांने बेदरकापणे डंपर न थांबवता आष्ट्याच्या दिशेने पळविला. घटनास्थळी जमलेल्या प्रवाशांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळाचे चित्र पाहून लोक अचंबित झाले होते. आदित्यच्या डोक्यावरुन चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. तर अंकुश यांच्या धडाला डोकंच नव्हते, त्याच्या डोक्याचा शोध उपस्थित घेत होते.
पोलिस निरिक्षक अजीत सिद, मनमित राऊत घटनास्थळी आले. नागरिकांनी माहिती दिली. अंकुश यांचे डोके डंपरमध्ये अडकून पुढे गेल्याचे समजले. पोलिसांकडून डोके मिळण्यासाठी डंपरचा शोध सुरु होता. घटनास्थळाचे दृश्य मन हेलवणारे होते. गाडीचे पुढील चाक तुटले होते. मेंदू इतरत्र पडला होता. रुग्णवाहिका चालक साजन अवघडे, ओंकार डांगे यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवले. घटना स्थळ रक्तरंजीत झाले होते.
आगाशिवनगरचे पोळ कुटुंबियावर घाला घातला त्याच परिसरात पिता- पुत्र ठार
मागील महिन्यात याच रस्त्यावरील तुजारपूर फाटा येथे झालेल्या अपघातात कराड -आगाशिवनगर येथील एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले होते. तर आठवडयापुर्वी बावची फाटा येथे सांगली येथील युवक ठार झाला होता. आज अहिरवाडी फाटा येथे पिता-पुत्र मयत झाल्याने पंधरा दिवसात रस्त्यावरील पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये आठ जण मयत झाले तर दहाजण जखमी झाले आहेत.