हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीचा गोलंदाज आर अश्विनला फिंच विरोधात मांकडिंग (Mankading) करण्याची संधी होती, मात्र त्यानं तसे केले नाही. केवळ फिंचला ताकिद दिली. याला कारण असे आहे की, अश्विनचे कोच रिकी पॉंटिंग यांनी त्याच्यावर मांकडिंग न करण्याचे आधीच स्पष्ट केले होते.
या सामन्यात अश्विन गोलंदाजी करताना फिंच क्रिझ पुढे आल्याचे अश्विनने पाहिले आणि थांबला मात्र त्याने फिंचला बाद केले नाही. अश्विनकडे नॉनस्ट्राइकर एंडवर उभ्या असलेल्या फिंचला बाद करण्याची संधी होती. मात्र त्याने तसे केले नाही. उलट अश्विन स्टम्पजवळ उभा राहून हसू लागला. त्यानंतर फिंचला बाद न करता अश्विन पुन्हा गोलंदाजी करायला गेला.
ICYMI – Ashwin warns Finch.
No, not this time. R Ashwin gives Aaron Finch a warning at the non-striker's end.https://t.co/50haslDf0v #Dream11IPL #RCBvDC
— IndianPremierLeague (@IPL) October 5, 2020
अश्विनवर रिकी पॉटिंगचा दबाव
आयपीएल सुरू होण्याआधी अशी चर्चा होती की पॉटिंग आणि अश्विन यांच्यात मांकडिंगवरून वाद झाला होता. पॉंटिंगचे म्हणणे होते ती, फलंदाजाला ताकिद दिली पाहिजे, मात्र त्याला मांकडिंग करू नये. त्यामुळे पॉटिंगने अश्विनला असे न करण्यास सांगितले होते. त्यामुळे या सामन्यात अश्विननं कोचचे ऐकत फिंचला ताकिद दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’