हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Asia Cup 2022 स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याद्वारे 27 ऑगस्ट रोजी Asia Cup 2022 स्पर्धेला सुरुवात होईल. यावेळी भारत-पाकिस्तान 28 ऑगस्ट रोजी दुबईत येथे एकमेंकासोबत भिडणार आहे.
यावेळी गेल्या टी-20 विश्वचषकातील पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या चमूकडे असेल. Asia Cup 2022 याआधी श्रीलंकेत होणार होती. मात्र तेथील राजकीय परिस्थितीमुळे आता आशिया चषक यूएईमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होतील. 11 सप्टेंबर रोजी दुबईत या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टी-20 विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात असल्याने सर्व आशियाई संघ या स्पर्धेत आपले बलाढ्य संघ पाठवतील.
भारताला पाकिस्तान आणि क्वालिफायर मधील टीमसह अ गटात तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना ब गटामध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच यूएई, कुवेत, हाँगकाँग आणि सिंगापूर यापैकी एक संघ भारत आणि पाकिस्तानच्या गटात सामील होईल.
यापूर्वी आशिया कप टी-20 2016 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ समोरासमोर आले होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान एकूण 14 वेळा एकमेकांना भिडले आहेत. यामध्ये भारताने 8 तर पाकिस्तानने 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. Asia Cup 2022
यावेळी अ आणि ब गटातील दोन अव्वल संघ सुपर 4 फेरीसाठी पात्र ठरतील. अशा परिस्थितीत 4 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना महत्वाचा असेल. हे दोन्ही संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील अशी अपेक्षा आहे. सुपर 4 मधील अव्वल दोन संघांमध्ये 11 ऑगस्ट रोजी अंतिम सामना होणार आहे. Asia Cup 2022
भारत आणि पाकिस्तान विषयी बोलायचे झाल्यास हे दोन्ही संघ टी-20 मध्ये आतापर्यन्त 9 वेळा समोरासमोर आले आहेत. यामध्ये भारताने 6 तर पाकिस्तानने 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. एकदिवसीय सामन्यांविषयी बोलायचे झाल्यास हे दोन्ही संघ आतापर्यन्त एकूण 132 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. ज्यात टीम इंडियाने 55 तर पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत. तर 4 सामन्यांमध्ये निकाल लागू शकलेला नाही. कसोटी सामन्यात भारत आणि पाकिस्तान 59 वेळा भिडले आहेत ज्यामध्ये भारताने 9 जिंकले आहेत तर पाकिस्तानने 12 कसोटी जिंकण्यात यश मिळवले आहे. तर 38 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. Asia Cup 2022
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icccricketschedule.com/asia-cup-2022-schedule-team-venue-time-table
हे पण वाचा :
EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांना EPFO कडून दिली जाते पेंशन !!!
Medicine : ‘या’ 19 औषधांवर केंद्र सरकारकडून बंदीची टांगती तलवार !!!
Nazara Tech. च्या शेअर्सद्वारे मोठ्या कमाईची संधी, गेल्या 5 सत्रांमध्ये झाली 40 टक्क्यांनी वाढ
पेन्शनधारकांसाठी EPFO ने सुरू केली नवी सुविधा !!!
T20 World Cup नंतर ‘हे’ दिग्गज या फॉरमॅटमधून घेऊ शकतात निवृत्ती !!!