कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचा कळीचा सवाल; विधानसभा अध्यक्षांची कोंडी?

0
2
Asim Sarode Rahul Narvekar (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील १६ आमदार अपात्रतेच्या कारवाईला वेग आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसनेच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १६ आमदारांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयावर प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी आश्चर्य व्यक्त करत कायद्याचा दाखला देत काही सवाल केले आहेत. शिंदेंसोबतचचे आमदार पळून गेले, पण उध्दव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेतील आमदारांना अपात्रतेची कारवाई का करू नये याचे स्पष्टीकरण/ कारणे दाखवा नोटीस राहुल नार्वेकर यांनी कशाच्या आधारे पाठवली असा सवाल करत त्यांनी नार्वेकरांची कोंडी केली आहे.

असीम सरोदे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी –

एकनाथ संभाजी शिंदे गटाचे 16 आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले इतर यांना अपात्रतेच्या नोटिसनुसार कारणे/स्पष्टीकरणे द्या असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सचिवांच्या मार्फत देणे समजण्यासारखे आहे. परंतु उध्दव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेतील आमदारांना अपात्रतेची कारवाई का करू नये याचे स्पष्टीकरण/कारणे दाखवा नोटिसेस राहुल नार्वेकर यांनी कशाच्या आधारे पाठवल्यात याबाबत जाणून घेण्याची कायदेशीर-उत्सुकता मला आहे.
कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या 141 पानांच्या निकालात २०६ ड या परिच्छेदामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की विधी मंडळ पक्ष whip प्रतोद नियुक्त नेमु शकत नाही तर मूळ राजकीय पक्ष नेमु शकतात असं असीम सरोदे यांनी म्हंटल.

https://www.facebook.com/asimsarode/posts/10160856633210185?ref=embed_post

विधानसभा अध्यक्षांनी ओरिजिनल राजकीय पक्षाने नियुक्त केलेला व्हीपच मानावा. 156व्या परिच्छेद सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की अपात्रतेते बाबत प्रक्रिया करतांना निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा कोणताही संदर्भ विधानसभा अध्यक्षांनी घेऊ नये म्हणजेच शिवसेना कोणाची या बाबत ECI ने दिलेल्या निर्णयाचा कोणताही प्रभाव न ठेवता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे. 123 व्या परिच्छेद सांगितले आहे की एकनाथ शिंदे यांना विधिमंडळचा लिडर म्हणून मान्यता देण्याचा राहुल नार्वेकर यांचा निर्णय बेकायदेशीर होता.

119 व्या परिच्छेद स्पष्ट केले आहे की 3 जुलै 2022 रोजी भरत गोगावले यांना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे शिवसेना गटाचा whip म्हणून मान्यता दिली तो निर्णय बेकायदेशीर होता.याचाच अर्थ भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेना पक्षातील आमदारांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील विधानसभा अध्यक्षांकडे दिलेला प्रस्ताव सुद्धा बेकायदेशीर आहे. आणि 2 दिवसांपुर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेतील आमदारांच्या नावाने अपात्रते संदर्भात काढलेल्या कारणे दाखवा नोटीस बेकायदेशीर व घटनाबाह्य आहेत असं म्हणत सरोदे यांनी विधानसभा अध्यक्षांची कोंडी केली आहे.