महिला पत्रकारावर भडकले डोनाल्ड ट्रम्प, ‘हा’ प्रश्न विचारताच म्हणाले तुम्ही कोणासाठी काम करता?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाव्हायरस विषयी आयोजित एका पत्रकार परिषदेत महिला पत्रकारावर चिडले आणि तिला आवाज कमी करण्यास सांगितले.खरं तर, रविवारी सीबीएसच्या वार्ताहर वेइजिया जियांग यांनी ट्रम्प यांना विचारले की,या साथीच्या धोक्यानंतरही त्यांनी फेब्रुवारी महिन्यात मोर्चे का काढले आणि मार्चच्या मध्यापर्यंत सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी करण्यात ते अपयशी ठरले.या प्रश्नांवर, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पहिले हे जाणून घ्यायचे होते की ती रिपोर्टर कोणासाठी काम करते आहे.

ट्रम्प यांनी विचारले, “तू कोणाबरोबर आहेस … होय, तू कोणाबरोबर आहेस?” यानंतर, जानेवारीच्या शेवटी चीनमधून येणाऱ्या उड्डाणांच्या बंदीबद्दल त्यांनी सांगितले.अमेरिकेने २ फेब्रुवारी रोजी चीनकडून येणार्‍या विमानांवर बंदी घातली होती.जेव्हा जियांग म्हणाली की ही बंदी केवळ चीनमधून येणाऱ्या चिनी नागरिकांवरच होती आणि त्यांच्याबरोबर विषाणू आणू शकणार्‍या अमेरिकन लोकांवर नव्हती, तर त्यांच्यावर देखील बंदी का नाही घातली गेली,तेव्हा ट्रम्प यांनी त्यांना रोखले आणि म्हणाले, “हळू ,हळू फक्त जरा धीर धरा. आम्ही जे केले त्याने लोक खूष झाले,आम्ही असे केल्याने प्रत्येकजण आनंदी होता.

ट्रम्प यांनी जियांगला सांगितले की त्यांनी योग्यरित्या रिसर्च केलेले नाही.ट्रम्प म्हणाले, “जेव्हा मी बंदी लागू केली तेव्हा अमेरिकेत व्हायरसच्या किती घटना घडल्या?” तुम्हाला नंबर माहित आहे का? जेव्हा त्यांना उत्तर मिळालं नाही, तेव्हा ट्रम्प म्हणाले, “नाही, आपल्याला रिसर्च करावे लागेल.”आणि जेव्हा जियांगला उत्तर द्यायचे होते तेव्हा ट्रम्प म्हणाले, “कृपया आपला आवाज खाली ठेवा, आवाज खाली ठेवा.”

मग ते म्हणाले की बंदी घालण्यापूर्वी अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली नाही. मग जिआंग म्हणालय कि,’चांगल्या निर्णयाबद्दल तुमचे आभार.’कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत आतापर्यंत ४२८९७ लोकांचा बळी गेला आहे आणि एकूण संसर्ग झालेल्या प्रकरणांची संख्या ७,९९,५१५ झाली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment