मुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुस्लीम समाजातील पुरुषांच्या विवाहबाबत आणि त्यांच्या एकापेक्षा जास्त असलेल्या पत्नीबाबत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी मोठे विधान केले आहे. “स्वतंत्र भारतात राहणाऱ्या कोणत्याही पुरुषाला तीन ते चार महिलांशी लग्न करण्याचा हक्क नाही. मुस्लीम पुरुष एकापेक्षा जास्त लग्न करू शकतात पण मुली शाळेत शिकू शकत नाहीत. कारण AIUDF च्या प्रमुखांच्या सल्ल्यानुसार महिला २० ते २५ बाळांना जन्म देऊ शकतात. पण त्यांचे अन्न, कपडे आणि शिक्षणावरील खर्च विरोधी नेत्यांनी करावा, असे शर्मा यांनी म्हंटले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी माध्यमांशी संवाद असधला. यावेळी ते म्हणाले की, “स्वतंत्र भारतात राहणाऱ्या कोणत्याही पुरुषाला तीन ते चार महिलांशी लग्न (पत्नीला घटस्फोट न देता) करण्याचा हक्क नाही. आम्हाला ही पद्धत बदलायची आहे. मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल.

आम्हाला ‘सबका साथ, सबका विकास’ हवा आहे. जर आसामी हिंदू कुटुंबात डॉक्टर असतील, तर मुस्लीम कुटुंबांमधून डॉक्टर असले पाहिजेत. अनेक आमदार असे सल्ले देत नाहीत, कारण त्यांना ‘पोमुवा मुस्लिमांकडून’ फक्त मते हवी असतात. पूर्व बंगाल किंवा सध्याच्या बांगलादेशातून आलेल्या बंगाली भाषिक मुस्लिमांना आसाममध्ये ‘पोमुवा मुस्लिम’ म्हणतात.

बद्रुद्दीन काय म्हणाले?

आसाममधील करीमगंजमध्ये खासदार बदरुद्दीन यांनी म्हंटले होते कि, मुस्लिमांप्रमाणेच हिंदूंनीही मुलांच्या बाबतीत सूत्र पाळले पाहिजे. त्यांनी लहान वयातच लग्न करावे. ते (हिंदू) लग्नापूर्वी एक, दोन किंवा तीन अवैध बायका ठेवतात. परंतु मुले तयार करू नका आणि मजा करा आणि पैसे वाचवा. मात्र, या विधानावर गदारोळ झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आणि मला याची लाज वाटत असल्याचे खा. बदरुद्दीन यांनी सांगितले.