Wednesday, October 5, 2022

Buy now

कंपनी व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

औरंगाबाद – चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील अवनीश इंटरप्रायजेस कंपनीच्या व्यवस्थापकासह सुरक्षारक्षकावर पूर्ववैमनस्यातून एकाने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यामळे पुन्हा एकदा उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. .

याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदर कंपनीच्या आवारात तीघेजण घुसले त्यांनी, सुरक्षारक्षक माणिक देवराव पहुरे (४४, रा.संजयनगर, मुकूंदवाडी) यांना आणि कंपनीचे व्यवसथापक जोशी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी पहुरे यांना पकडून हल्लेखोरांनी त्यांच्या तोडाला चिकटटेप लावला होता. हा प्रकार घडत असतांना काही लोक तेथे जमा झाल्यावर हल्ला करणाऱ्यांनी जमा झालेल्या लोकांना शस्त्राचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मांटे करीत आहेत.