“आणखी एक फर्जिवाडा, धन्य दाऊद ज्ञानदेव” नवाब मलिकांचा वानखेडे कुटूंबावर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याकडून गेल्या अनेक दिवसापासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच त्याच्या कुटूंबियांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान त्यांनी आज नवीन ट्विट करून वानखेडे कुटूंबियांवर हल्लाबोल केला आहे. “आणखी एक फर्जिवाडा, अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव” असे ट्वीट करत मलिक यांनी काही कागदपत्रे शेअर केली असून आरोपही केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी “आणखी एक फर्जिवाडा, अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव” असे म्हणत महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रं नवाब मलिक यांनी शेअर केली आहेत.

दरम्यान यापूर्वी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी एक स्पष्टीकरण दिले होते. त्यामध्ये त्यांनी “मी अनुसूचित जमाती वर्गातील आहे आणि माझा मुलगाही अनुसूचित जमाती वर्गातील आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्ट केले होते.

नवाब मलिक यांनी केलेल्या नव्या आरोपानंतर आता मलिक यांच्या आरोपांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच त्यांचे वडील आणि कुटूंबीय काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

You might also like