जावलीतील अतिवृष्टीत मृत पावलेल्या वारसांना शासनाकडून मदतीचा धनादेश सुपूर्द

जावळी तालुक्यात आ. शिवेंद्रराजे यांच्या हस्ते वितरण

जावली | रेंगडी (ता. जावली) येथील चार व वाटंबे येथील एक असे 5 जण केळघर घाटातील ओढ्याला आलेल्या पुरातुन वाहुन गेले होते. यामध्ये पाचही जणांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे शासनाच्या वतीने या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखाचा मदतीचा धनादेश सपुर्द करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारकडुन लवकरात लवकर मदत मिळावी म्हणुन सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे आ. शिवेंद्रराजे भोसले याचा पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे.

महाराष्ट्रराज्याचे उपमुख्यमत्री अजितपवार यांनी महाविकास आघाडी सरकार कडुन सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे मृतांना आर्थिक मदतीची घोषणा केली होती. जावलीमध्ये रेगडी येथे घटना घडल्यापासुन जावलीच्या तहसिलदारांना मृत झालेल्या कुटुंबाला आर्थीक मदतीचे प्रस्ताव सादर करावे याबाबत पाठपरुरावा केला होता. जावलीतील रेगडी येथील घटनेमध्ये मृतांना प्रत्येकी 9 लाख देण्यात येणार आहेत. यापैकी 5 लाख रुपायाचा प्राथमिक टप्पा मृताच्या नातेवाईकांना देण्यात
आला आहे .

यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रांतअधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतिष बुद्धे, ज्ञानदेव रांजणे, जि .प . सदस्य  राजु भोसले, सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जेष्ठ शिवसेना नेते एस. एस. पार्टे, सरपंच बाबुराव कासुर्डे,  तलाठी मकरध्वज डोईफोटे, ग्रामसेवक रविकांत  सपकाळ , सागर धनावडे, प्रमोद घाडगे यांचे प्रमुख उपस्थितीत धनादेश सपूर्द करण्यात आले.

You might also like