पोलीस दलात खळबळ ! हजारोंची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना – गुन्ह्यात आरोपी न करता तपासात मदत करण्यासाठी एका व्यक्तीकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात पकडले. मागील काही दिवसापासून पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये लाच घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, एसीबी ची कारवाई देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे पोलिस दलात सध्या खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे (36, रा. जालना) व तीन शिपाई चरणसिंग सिंघल (32, रा. पोलीस क्वार्टर, जालना) सेल आज घेणाऱ्यांची नावे असून दोघेही तालुका जालना पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, तालुका जालना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रेड्यांची झुंज लावणार्‍यांवर कारवाई करत संशयितांवर गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यात लाच प्रकरणातील तक्रारदाराचे नाव आहे. त्यामुळे त्यास पोलिसांना अटक करायचे असल्याने सहाय्यक निरीक्षक कासुळे व शिपाई सिंघल यांनी तक्रारदारास ठाण्यात बोलावून घेतले. दाखल गुन्ह्यात आरोपी न करता मदत करण्यासाठी 30 हजारांची लाच मागितली.

मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत विभागाने लाचेच्या मागणीचे पडताळणी करून शनिवारी दुपारी तालुका ठाण्याच्या आवारात सापळा लावला. तेव्हा शिपाई सिंघल या सहाय्यक निरीक्षक कासुळे यांच्या सांगण्यावरून तीस हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. तर एसीबीच्या पथकाने सहाय्यक निरीक्षक कासुळे यांनाही ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Leave a Comment