शाहरुख खानचा मुलगा आर्यनची एनसीबी कडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने याठिकाणाहून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केल्याचे समजते. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी सुरु आहे.  यात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मुलाचा समावेश आहे.

या रेव्ह पार्टीत बॉलीवूडशी संबंधित काहीजण उपस्थित असल्याची माहिती होती. यात महिलांचाही समावेश आहे. दरम्यान या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही एनसीबीने ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी केली सुरू असल्याची माहिती एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली. त्यामुळे आता बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाला नव्याने फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

रेव्ह पार्टी प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खान याची चौकशी केली जात आहे. त्याच्याविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. तसंच अटकही केलेली नाही. याप्रकरणात जहाजाचे मालक आणि पार्टी आयोजित करणाऱ्या कंपनीच्या मालका चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे. याबद्दलची अधिक माहिती दुपारी देण्यात येईल’, असं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

You might also like