हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या होत असलेली लग्ने ही काहींना काही कारणांनी चर्चेत येत आहेत. नुकतेच एक लग्न हे एका कारणांनी चर्चेत आले होते. ते म्हणजे या लग्नात मित्रांनी चक्क आपल्या नवरदेव मित्राला पेट्रोल भेट म्हणून दिले होते. त्यानंतर आता नवरदेवाला चक्क लिंबू भेट देण्यात आल्याचाही प्रकार एका लग्नात घडला असून त्यामुळे हे लग्नही चर्चेत आले आहे.
देशात महागाई सातत्याने वाढत आहे. या वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारताला बसला आहे. तामिळनाडू, आध्र प्रदेश आणि तेलंगनामध्ये एफएमसीजी वस्तू खरेदीचे प्रमाण सुमारे दहा टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाले आहे. भारतात देखील महागाईचा भडका उडाला असून पेट्रोल , डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यानंतर आता भाजीपाल्याचेही दर वाढू लागले आहेत.
त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. यामध्ये लिबांचेही दर वाढले असून या दरवाढीमुळे गुजरातच्या राजकोटमध्ये झालेल्या एका लग्नात मित्रांनी नवरदेवाला चक्क लिंबू भेट दिली आहेत. त्यामुळे या लग्नाची देखील सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
गुजरात: राजकोट के धोराजी शहर में एक शादी समारोह के दौरान लोगों ने दूल्हे को नींबू भेंट किए।
दिनेश ने बताया, "इस समय राज्य और देश में नींबू की कीमतें बहुत बढ़ गई हैं। इस मौसम में नींबू की बहुत जरूरत पड़ती है। इसलिए मैंने नींबू भेंट किए हैं।" (16.04) pic.twitter.com/ciQ9MlwIC3
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2022
नेमंक प्रकरण काय?
गुजरातच्या राजकोटमध्ये नुकतेच एक लग्न पार पडले. या लग्नात नवरदेवाची मित्रही मोठ्या संख्येने आले होते. यावेळी नवरदेवाच्या मित्रांनी त्याला चक्क गिफ्ट म्हणून लिंबू भेट दिले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर तर वाढतच आहेत. मात्र आता भाजीपाल्याचे दर देखील वाढू लागले आहेत. लिंबाचे दर तर शेकडा हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात एक लिंबू दहा रुपयांना मिळत आहे. याचा निषेध म्हणून नवरदेवाच्या मित्रांनी त्याला लिंबाची भेट दिली आहेत.