नवी दिल्ली । मोदी सरकारच्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत रोज ७ रुपये वाचवून ६० वर्षे वयानंतर महिन्याला ५,०००रु पेन्शन मिळू शकणार आहे. याचा अर्थ वर्षाला ६० हजार रुपये मिळू शकतात. या योजनेत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या पेन्शन योजनेत आता वर्षभरात केव्हाही आपण पैसे वाढवू अथवा कमी करू शकणार आहोत. १ जुलै पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. या बदलाचा हेतू या योजनेला अधिक आकर्षक बनविणे हा आहे.
या आधी या योजनेत केवळ एप्रिल महिन्यातच आपल्या रकमेत बदल करण्याचा अधिकार सभासदांना होता. पीएफआरडीए नुसार सभासद वित्तीय वर्षात केवळ एकदाच पेन्शन योजनेत बदल करू शकतात. अटल पेन्शन योजनेनुसार जवळपास २.२८ कोटी अंशधारक लोक आहेत. पीएफआरडीए ने एपीवाई योगदान रकमेसंदर्भात असेही सांगितले की १ जुलै २०२० पासून अंशधारकच्या बचत खात्यातून आपोआप रक्कम कापली जाईल.
कोविड-१९ च्या महामारीमुळे रक्कम जमा करण्यात ३० जून पर्यंत अटकाव घालण्यात आला होता. सद्यस्थितीत एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंत रक्कम जमा करण्यात अटकाव घालण्यात आला आहे. ३० सप्टेंबर पर्यंत अंशधारकांच्या खात्यातून ते आपोआप कापले जाणार आहेत. त्यासाठी त्यांना कोणताच दंड भरण्याची गरज नाही.