Atal Setu Mumbai : मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (MTHL) ला आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी -न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव देण्यात आले आहे. हा पूल बांधून तयारअसून काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचे उदघाटन करण्यात आले. अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे. हा पूल 21.8 किमी लांबीचा आणि 6 लेनचा आहे. समुद्रावर या पुलाचे अंतर 16.5 किमी असून देशातील हा सर्वात लांब सागरी सेतू आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत कापता येते. यापूर्वी हे अंतर पार करण्यासाठी २ तास लागायचे
मुंबई ट्रान्सहार्बर लिंक हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्याशी उत्तम कनेक्टिव्हिटी साधतो. एवढंच नव्हे तर त्यामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होईल. आज आपण या सागरी सेतू बद्दल 10 खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
अटल सेतू च्या 10 खास गोष्टी- Atal Setu Mumbai
१) मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत कापता येते. ज्याला दोन तास लागत होते. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्याशी उत्तम कनेक्टिव्हिटी साधतो. एवढंच नव्हे तर त्यामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होईल.
२) अटल सेतूच्या बांधकामात सुमारे 177,903 मेट्रिक टन स्टील आणि 504,253 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले आहे.
३) हा पूल अंदाजे 18,000 कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे. त्यावरून दररोज अंदाजे 70,000 वाहने धावतील आणि 100 वर्षे या पुलाला कोणताही धोका नाही.
४) चालकांना अटल सेतूवर (Atal Setu Mumbai) ताशी 100 किमी वेगाने प्रवास करण्याची परवानगी असेल. सागरी सेतूवर अवजड वाहने, दुचाकी, ऑटो रिक्षा आणि ट्रॅक्टर यांना परवानगी नसेल.
५) यावरील प्रकाशाचे खांब पावसाळ्यात उच्च-वेगाचे वारे सहन करण्यासाठी विशेषतः डिझाइन केलेले आहेत. विजेमुळे होणार्या संभाव्य नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी लाइटिंग प्रोटेक्शन सिस्टीम देखील बसवण्यात आली आहे.
६) त्यामध्ये स्टील डेक वापरले त्यामुळे जास्तीची वहन क्षमता निर्माण झाली आहे. हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे त्यामुळे इथले फ्लेमिंगो जाऊ नये म्हणून काम करत असताना नॉईज बॅरिअरचा वापर करण्यात आला आहे.
७) तसेच रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल आणि टेम्पररी इम्बाक्टमेंट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
८) चार हावडा ब्रीज होतील, सहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होतील एवढे स्टील वापरण्यात आले आहे. पृथ्वीला दोन वेळा प्रदक्षिणा होतील एवढ्या वायर्स ह्या प्रकल्पात वापरले आहेत.
९) अटल सेतू (Atal Setu Mumbai) मुख्य मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडण्यासाठी डिझाइन केले आहे, ज्यामुळे राज्यातील दोन मोठ्या शहरांमधील संपर्क अधिक वाढेल.
१०) समुद्रसपाटीपासून 15 मीटर उंचीवर बांधलेला हा सागरी पूल हा बांधकामाचा सर्वात कठीण भाग होता. सागरी भागात अभियंते आणि कामगारांना समुद्रसपाटीपासून ४७ किमी खाली खोदकाम करावे लागले.